Friday, August 28, 2009

"तो थेम्ब"

आजही रानात "ती" एकटी बसली होती
शुन्यात हरवलेली

अतिशय दबकत दबकत पावले टाकली
तीला भेटण्यासाठी

ती मात्र हरवली होती कुठल्यातरी भावविश्वात
ह्या आयुष्याच्या कचाट्यात

मग मी ही मोडली नाही तिची गूढ़शांत समाधी
हळूच बसलो शेजारी

न्याहळत होतो तीच्या मुद्रेवरचे बदलणारे रुतु
ती उगाळत बसली होती भुतकालातील कटु

मग तीची समाधी भंग पावली
मला पाहून ती थोडीशी बिथरली



"आजही नाही आला रे तो....
सगलेच पुरुष ह्रदयशुन्य असतात
दूसरी मिळाली की पहिलीला विसरतात..."


आजही माझा हात तीच्या डोक्यावर स्थिरावला
तीच्या डोळ्यातील "तो थेम्ब" आजही नकोसा वाटला....

अमित...

(माझी कविता)

No comments:

Post a Comment