Wednesday, September 2, 2009

मी "वेडा" .....


लोक म्हणतात "तू 'वेडा' आहेस",
आहे मी वेडा, ह्या शहाण्या जगापासून दूर....

मी वेडयासारखं प्रेम करतो माझ्या मात्रुभुमीवर...
मी वेडयासारखं प्रेम करतो माझ्या आई-वडीलांवर....
मी वेडयासारखं प्रेम करतो माझ्या भावावर, सवंगडयानंवर....
मी वेडयासारखं प्रेम करतो Physics-च्या प्रत्येक concept-वर....
मी वेडयासारखं प्रेम करतो ह्या पानावर त्या फुलावर....
मी वेडयासारखं प्रेम करतो तलपत्या सूर्यावर.. शीतल चंद्रावर....
मी वेडयासारखं प्रेम करतो घनदाट मेघान्वर....
मी वेडयासारखं प्रेम करतो पावसाच्या प्रत्येक थेम्बावर....
आता तुम्हीच सांगा.. आहे ना मी "वेडा"....


मला शहानपणाचाही अर्थ जाणून घ्यायचाय...
त्यासाठी एखादा शहाणा ही शोधायचाय ...


"मला माझं आयुष्य कल्पतरु सारखं व्यतित करायचं.. !
फ़क्त दुसऱ्याला देत रहायचायं..... देत रहायचायं..... !!!"

अमित...

(माझी कविता)

No comments:

Post a Comment