Sunday, November 8, 2009

"रानटी कुत्री"



त्या भयाण चिम्ब पाउस रात्री
मनुष्याची दोन पिल्ले भिजत पडली होती


काही तासांची.... दोन जुळी...
जगात कोणालाही नको असणारी...


दोन जीवांचा क्षणिक आनंद त्यांच्या जीवावर बेतला होता
आसपासच्या रानटी कुत्र्यांनी मात्र आपला सावज नेमका हेरला होता


भुकेनी रडून रडून आता चिमुरड्यान्चा आवाजाही शांत झाला
यमसदनी निघालेल्या पावलांचा कदाचित त्यांनाही भास झाला


रानटी कुत्र्यांना आपले भक्ष असेच आरामात मिळणार आहे
जोपर्यंत माणूसच माणूसकीचे लाखो तुकडे करणार आहे


अमित...

2 comments: